राज्यातील वृद्ध व्यक्तींसाठी शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु केली, असून या योजनेमध्ये पात्र लाभार्थीला विवध आवश्यक वस्तू चष्मा, लंबर बेल्ट, श्रवण यंत्र, ट्रायपाँड, फोल्डिंग वॉकर, स्टील व्हील चेअर, नि-ब्रेस, सर्वाइकल कॉलर, कमोड खुर्ची इ. लाभ मिळू शकतो, तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मनशक्ती केंद्र/प्रशिक्षण केंद्र, मन स्वास्थ केंद्र येथे सहभागी होता येईल.